शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आल्याने विमान १५ मिनिटे हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:04 PM

या प्रकारामुळे विमानतळ सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर हुंदडणाऱ्या कुत्र्यामुळे बुधवारी लँड होता होता विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली.  किमान १५ मिनिटे विमान हवेत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुत्र्याला हाकलल्यानंतर विमान पुन्हा उतरले; पण अचानक झालेल्या या प्रकाराने विमानातील लोकप्रतिनिधीसह प्रवासी गोंधळून गेले. मुंबईहून आलेल्या या विमानाबाबत घडलेल्या प्रकारामुळे विमानतळ सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

मुंबईहून निघालेले विमान औरंगाबादेत पाच वाजता आले.  धावपट्टीवर ते उतरत होते. चाके धावपट्टीवर टेकणार असे वाटत असतानाच अचानक विमानाने वेग घेतला आणि ते झपाट्याने पुन्हा झेपावले. टेकण्याच्या बेतात असताना अचानक वेग वाढून विमान पुन्हा झेपावल्याने प्रवासी संभ्रमात होत.

याबाबत चौकशी केल्यावर कळाले की धावपट्टीवर कुत्रे आल्याने विमान उतरवले नाही. मात्र विमानतळाचे अधिकारी असे काही झाले नसल्याचे म्हणाले. काही प्रवासी असा प्रकार घडल्याचे सांगतात. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानpassengerप्रवासी