विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र सुरू होणार
By Admin | Updated: June 27, 2016 01:06 IST2016-06-27T00:41:40+5:302016-06-27T01:06:48+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅब एव्हिएशन कंपनीकडून एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू केली जाणार आहे

विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र सुरू होणार
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅब एव्हिएशन कंपनीकडून एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा सुरू करण्याबरोबर विमानतळावर विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र सुरू करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कं पनीने विमानतळावर हँगर उभारणीसाठी मंजुरी मागितली आहे. ही मंजुरी मिळाल्यास चिकलठाणा विमानतळावर आगामी कालावधीत मॅब एव्हिएशनसह अन्य कंपन्यांच्या विमानांचीही देखभाल-दुरुस्ती करता येईल.फेब्रुवारीत हैदराबादला जाणारे एक विमान बिघडले होते.