परिचारिकांच्या सेवाभावाला हवा सुविधांचा हातभार !
By Admin | Updated: May 12, 2015 00:52 IST2015-05-12T00:03:31+5:302015-05-12T00:52:13+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड मागील पाच-दहा वर्षात नर्सिंग क्षेत्राकडे पहाण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. परिणामी नवीन मुली या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत.

परिचारिकांच्या सेवाभावाला हवा सुविधांचा हातभार !
व्यंकटेश वैष्णव, बीड
मागील पाच-दहा वर्षात नर्सिंग क्षेत्राकडे पहाण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. परिणामी नवीन मुली या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत. शासकीय सेवेबरोबरच खाजगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात नौकऱ्या उपलब्ध आहेत. तीन हजारांवर ‘एनएम’ तर पाचशेच्या जवळपास ‘जीएनएम’ यांची संख्या आहे. रुग्णांना परिचारिकांमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा मुबलक मिळाल्या तर रूग्णांचे नातेवाईक व परिचारिका यांच्यात खटके उडण्याचा प्रश्नच उद्भवनार नाही, असा सूर परिचारिकांनी यानिमित्ताने आळवला आहे.
रूग्णसेवेचा वसा हाती घेवून रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा, असे मानून जिल्ह्यात साडेतीन हजार परिचारिका काम करीत आहेत. समाजसेवेचे अंग असलेल्या या क्षेत्राचे वेगळेपण निश्चितच आहे. दरवर्षी जिल्ह्यातील २४ ते २८ नर्सिंग विद्यालयातून साडेआठशेच्या जवळपास परिचारीका रूग्णसेवेचे धडे घेतात. परिचारिका या डॉक्टरांइतक्याच महत्वाचा भाग आहे. डॉक्टर उपचार करून जातात अन् परिचारिका रूग्णांची सेवा करतात़ या सेवाभावाला सुविधांचा हातभार मिळाला तर रूग्ण व परिचारिका यांच्यात उडणारे खटके बंद होतील. जागतिक परिचारिका दिनानिमित्त ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...