पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट

By Admin | Updated: April 14, 2016 01:12 IST2016-04-14T00:41:54+5:302016-04-14T01:12:14+5:30

शिरीष शिंदे , बीड यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे,

Aim of 2 thousand 60 crores of crop sharing | पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट

पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट


शिरीष शिंदे , बीड
यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना पीककर्ज वाटपाचे २ हजार ५९ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. विशेष म्हणजे पीककर्जासह वाहन, हाऊसिंग, शिक्षण, कृषी संबधी व इतर अशा सर्व क्षेत्रांसाठी ३ हजार ६९६ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वाटप करावे लागणार आहे.
२०१५-१६ मध्ये बँकांना पीककर्जासाठी एक हजार ८०६ कोटी ९ लाख रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यात यंदा ११ ते १२ टक्के वाढ होऊन ते दोन हजार ५९ कोटींवर जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये औद्योगिक व व्यवसायासाठी ७९८ कोटी ७५ लाख, गृहनिर्माणसाठी १७५ कोटी, शिक्षणासाठी ११५ कोटी, इतर बाबींसाठी ५६ कोटी ८८ लाख तर कृषिसंबंधी असलेल्या म्हणजेच पॉवर, ट्रिलर, ट्रॅक्टर, गायी-म्हशी यासाठी ४८२ कोटी २४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील २२ राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखा तसेच तीन व्यावसायिक बँका यांच्यासह इतर बँकांना हे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार शाखानिहाय कर्जवाटप यावर्षी होईल.
शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज ?
जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी घेतलेले पीककर्ज फेडता आलेले नाही. आता चांगला पाऊस असला तरी त्यांना नव्याने पीककर्ज मिळेल का ? याबाबत कोणत्याही सूचना बँकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज घेऊन परत करणाऱ्यांनाच कर्ज मिळेल, अशी शक्यता आहे.

Web Title: Aim of 2 thousand 60 crores of crop sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.