अहमदपूर मतदारसंघ भाजपाचा आहे आणि राहणार
By Admin | Updated: August 24, 2014 00:20 IST2014-08-23T23:58:16+5:302014-08-24T00:20:33+5:30
अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ १९८६ पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे़ महायुतीतील रासपला देण्यात येऊ नये अशी भूमिका अहमदपूर

अहमदपूर मतदारसंघ भाजपाचा आहे आणि राहणार
अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ १९८६ पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे़ महायुतीतील रासपला देण्यात येऊ नये अशी भूमिका अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सर्व इच्छुकांनी एका व्यासपीठावर येऊन मागणी केली़ आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न केला आणि आता आयत्या पिकावर दुसरीच पाखरं ताव मारण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षासाठी काम करायचे की नाही असा आक्रमक सवालही त्यांनी केला़
अहमदपुरात दोन दिवसापूर्वी रासपचा मेळावा झाला़ या मेळाव्यात रासपचे नेते महादेव जानकर यांनी अहमदपूर मतदारसंघ महायुतीकडून रासपकडे घेणार असल्याचे सांगितल्याने हा मतदारसंघ रासपला सुटणार असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे तालुक्यातील भाजपाचे तुल्यबळ नेते आपआपसातील मतभेद विसरुन एकत्रित आले होते़ आपापले गट विसरुन एकमेकांच्या गळ्यात गळा घालून यांनी मतदारसंघ भाजपाचा आहे़ आणि भाजपालाच रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली़ यामध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, बाजार समितीचे सभापती अॅड़ भारत चामे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, अशोक केंद्रे, सरपंच शिवाजीराव भिकाणे, माजी नगराध्यक्ष सुधाकर नागरगोजे, त्र्यंबक गुट्टे, बाबुराव जंगापल्ले आदींची उपस्थिती होती़
याठिकाणाहून दोनदा भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे़ गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला ५६ हजार मतांची आघाडी मिळाली आहे़ त्यामुळे हा मतदारसंघ भाजपालाच रहावा़
यावेळी हाके म्हणाले, महायुतीची जागा वाटपाची कुठलीही चर्चा अद्याप उच्च पातळीवर झाली नाही़ मतदारसंघ सोडत असताना मतदारांचा कौल पाहिला जातो़ त्यावर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात येतो़ कुठलीही चर्चा झाली नसल्याने निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले़ (वार्ताहर)
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा परंपरागत मतदारसंघ आहे़ मी पाच वर्षे भाजपाचा आमदार म्हणून काम केले आहे़ दुसऱ्यावेळी झालेल्या निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झाला़ कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ रासपला सुटणार नाही़ भाजपाकडे राहील़
-बब्रुवान खंदाडे, माजी आमदार
४भाजपा वाढविण्यासाठी अहमदपूर तालुक्यात गेल्या १५ वर्षांपासून काम केले, ऐनवेळी परका माणूस रासपचे तिकिट घेऊन इथली भाजपा संपविण्याचा कट करत असेल तर ते खपवून घेणार नाही - दिलीप देशमुख,माजी सभापती
४हा मतदारसंघ भाजपाचा आहे़ तो कायम राहणार आहे़ कोणत्याही पक्षातील नवख्या उमेदवाराला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ भाजपाचा मतदारसंघ कायम राहणार आहे़
- अॅड़भारत चामे, माजी सभापती
४अहमदपूर मतदारसंघात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मतदारवर्ग अधिक आहे़ हा मतदारसंघ भाजपाचाच आहे आणि भविष्यात भाजपाचा राहील़ रासपला सुटणार नाही़
-अशोक केंद्रे, माजी सभापती
४भाजपाचा मतदारसंघ आहे, त्यामुळे दुसऱ्यांना सोडण्याचा प्रश्नच नाही़- सुधाकर नागरगोजे, माजी नगराध्यक्ष