आजपासून अहमदाबाद विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:50+5:302021-02-05T04:21:50+5:30
‘इंडिगो’चे विमान अहमदाबाद येथून रोज सकाळी १०.४५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.१५ वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी ...

आजपासून अहमदाबाद विमानसेवा
‘इंडिगो’चे विमान अहमदाबाद येथून रोज सकाळी १०.४५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.१५ वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १२.३५ वाजता हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या प्रश्नावरून मंगळवारी काम बंद आंदोलन केले. मात्र, वेतनाचा मुद्दा तत्काळ निकाली काढल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे आज संप
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि विद्युत बिल २०२०, स्टँडर्ड बिडिंग डाक्युमेंट रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे आज, बुधवारी लाक्षणिक संप करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
साखळी उपोषणाचा ८३ वा दिवस
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात थकीत वेतन, सेवेत कायम करणे यांसह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. दिवाळीपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा मंगळवारी ८३ दिवस ठरला. मागण्या मान्य पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
घाटीत लेक्चर हॉलच्या कामाला लवकरच सुरुवात
औरंगाबाद : घाटीत सीएसआर निधीतून उभारण्या येणाऱ्या लेक्चर हॉलच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तळमजला आणि तीन मजले अशी या लेक्चर हॉलची इमारत राहणार आहे. बांधकाम सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.