शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या नगरच्या टोळीला औरंगाबादेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:34 IST

crime news यावेळी पोलिसांना पाहून दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देजिंसी पोलिसांची मध्यरात्री कारवाईकारसह दरोड्याचे साहित्य जप्त 

औरंगाबाद: दरोडा सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीनिशी शहरात आलेल्या अहमदनगरच्या टोळीतील तीन संशयितांना  गस्तीवरील जिंसी पोलिसांनी पकडले. यावेळी पोलिसांना पाहून दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून कार, लोखंडी टॉमी, दोरी, मिरची पावडर आणि एअर गन जप्त करण्यात आले. 

मध्यवर्ती जकात नाका ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील गुलाब विश्व मंगल कार्यालयाजवळ ही कारवाई झाली. सुनील अंकुश मळेकर (२६, रा. आळंदी फाटा पुणे ), शेख नशीर शेख बशीर (२६, रा. करंजगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि शेख सलीम शेख बाबू (२६, रा. खटकाळी, ता. राहुरी)अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. शेख समीर शेख शब्बीर(२०, रा. खटकाळी) , कारचालक नजीर उर्फ साहिल शमशोद्दीन सय्यद(२२, रा. पोखरी, अहमदनगर) या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

जिंसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नजीर पठाण,पोलीस हवालदार वाघ, डी आर काकडे, हेमंत सुपेकर, शेख उस्मान आणि सुरेश वाघचौरे हे गुरुवारी रात्री गस्तीवर होते. मध्यवर्ती जकातनाका ते टीव्ही सेंटर रस्त्यावरून ते जात असतांना गुलाब विश्व मंगल कार्यालयाशेजारी त्यांना एक कार उभी दिसली. संशयावरून पोलिसांनी कारमधील लोकांना बाहेर येण्यास सांगितले. 

दोन आरोपी फरार यावेळी दोन जण कार सोडून सुसाट पळून गेले. कारमधून अन्य आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांचे नाव गाव विचारल्यावर शहरात येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांच्या कारची झडती घेतली असता कार मध्ये टॉमी, मिरची पावडर, दोरी असा दरोडा टाकण्यासाठी वापरला जाणाऱ्या वस्तू  आढळून आल्या. दरोडा टाकण्यासाठीच ते शहरात आल्याचा पोलिसांचा संशय पक्का झाल्याने सहायक उपनिरीक्षक पठाण यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस