शेती शाश्वत असावी

By Admin | Updated: November 28, 2014 00:09 IST2014-11-27T23:58:10+5:302014-11-28T00:09:48+5:30

जालना : नेहमीच्या अवर्षणाचा विचार करता शेती शाश्वत करण्याची गरज असून त्यादृष्टीने पीक व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर खर्च व पाण्याची काटकसर करुन शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे,

Agriculture should be sustainable | शेती शाश्वत असावी

शेती शाश्वत असावी


जालना : नेहमीच्या अवर्षणाचा विचार करता शेती शाश्वत करण्याची गरज असून त्यादृष्टीने पीक व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर खर्च व पाण्याची काटकसर करुन शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे यांनी केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हैद्राबाद येथील क्षेत्रीय प्रकल्प संचालनालयाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंदर रेड्डी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमाकांत घाटगे, राष्ट्रीय कृ:ी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशाषधन डॉ. ,स. बी. पवार, कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, डॉ. बी. आर. शिंदे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश कोहिरे, अग्रणी बॅँकेचे प्रदीप कुतवळ, नाबॉचे पी. जी. भागवतकर, माविमचेएम. डी. काळे, डॉ. जे. बी. देसाई, ए. डी. गुट्टे, प्रा. एस. व्ही. सोनुने, प्रगतशील शेतकरी उध्दवराव खेडेकर, बाबासाहेब काटकर, छायाताई मोरे आदींची उपस्थिती होती.
कृषि विज्ञान केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळण्यात या शास्त्रीय सल्लागार समितीचा मोठा फायदा झाल्याचे सांगून बोराडे म्हणाले की, बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, नेहमीचा अवर्षण काळ यांचा विचार करता शेती शाश्वत करण्याकरीता भविष्यामध्ये आपत्कालीन पीक व्यवस्थापन करतांना कमी पाणी, कमी खर्च करुन येणाऱ्या पिकांचा विचार व्हावा. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने रेशीम उद्योग, शेळी पालन, कुक्कूट पालन व फुलशेती इत्यादी व्यवसायाचा अवलंब करुन त्यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके उभारावीत व जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत प्रसारीत करण्याची गरज असल्याचे विजयअण्णा बोराडे यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचलन प्रा. अजय मिटकरी तर आभार प्रदर्शन प्रा. पंडीत वासरे यांनी केले.४
कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यात विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिके राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. यशस्वी प्रात्यक्षिकांचे प्रबंधीकरण करुन इतर भागाच्या विकासासाठी प्रसार करण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र रेड्डी यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख सोनुने यांनी मागील वर्षात केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल व पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर करुन सांगितलेल्या सूचनासंदर्भात माहिती दिली.

Web Title: Agriculture should be sustainable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.