दुप्पट उत्पादनासाठी कृषी प्रक्रिया, मुल्यवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST2021-05-13T04:05:21+5:302021-05-13T04:05:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गल्ले बोरगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर फक्त पिकांचे प्राथमिक उत्पन्न घेऊन जमणार नाही ...

Agricultural processing, value addition required for double production | दुप्पट उत्पादनासाठी कृषी प्रक्रिया, मुल्यवर्धन गरजेचे

दुप्पट उत्पादनासाठी कृषी प्रक्रिया, मुल्यवर्धन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क

गल्ले बोरगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर फक्त पिकांचे प्राथमिक उत्पन्न घेऊन जमणार नाही तर शेतमालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वनामकृवि परभणीचे संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले.

अन्न-धान्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी व प्राथमिक प्रक्रियेद्वारे त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद यांच्यातर्फे तीनदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील विविध तज्ज्ञांनी ‘अन्न धान्याचे प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन’ या विषयावर आपले मते मांडली. या ऑनलाईन कार्यक्रमात एनएआरपी औरंगाबादचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, डॉ. के. के. झाडे, विषय विशेषज्ञ प्रा. गीता यादव, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बसवराज पिसुरे आदी उपस्थित होते. या ऑनलाईन शिबिरात मराठवाड्यातील गावागावातील शेती अभ्यासकांनी सहभाग घेतला आहे.

Web Title: Agricultural processing, value addition required for double production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.