निलंबनप्रकरणी कृषी सहाय्यकांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:53 IST2017-09-16T23:53:14+5:302017-09-16T23:53:14+5:30
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी सहाय्यकांना चुकीच्या पद्धतीने निलंबित केले आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन १६ सप्टेंबर रोजी कृषी सहाय्यकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

निलंबनप्रकरणी कृषी सहाय्यकांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी सहाय्यकांना चुकीच्या पद्धतीने निलंबित केले आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन १६ सप्टेंबर रोजी कृषी सहाय्यकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
२०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्व कामांचे अंदाजपत्रके तयार न करणे तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे कामे थांबणे, मुख्यालयात हजर न राहणे आदी कारणांमुळे जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी कृषी सहाय्यकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांना कृषी सहाय्यकांनी उत्तरही दिले होते.
असे असताना या प्रकरणात आयुक्तांकडून काही कृषी सहाय्यकांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.
या निवेदनावर आर.के. यादव, एन.डी. अंभुरे, एम.एम. शिंदे, बी.यु.शिंदे, डी.एस.लोहार, एम.बी. दिक्कतवार आदींसह ९४ कृषी सहाय्यकांच्या स्वाक्षºया आहेत.