शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिल्लोडमध्ये कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:38 IST

कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, यामुळे आत्महत्या करण्याच्या कारणावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सिल्लोड : शहरातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी ८.३० वाजता एका कृषी सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. योगेश सोनवणे ( ३५, रा सिल्लोड) असे मृत कृषी सहायकाचे नाव आहे.

सोनवणे हे गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयात लेख विभागात ऑनलाइनची कामे करत होते. कार्यालय १० वाजता सुरू होते. मात्र कधी काम जास्त असले की ते ऑफिसला लवकर येत असत. आज सकाळी सकाळी ८ वाजता शिपायकडून त्यांनी कार्यालयाची चावी घेतली. सकाळी ८ :१५  वाजता ते ऑफिसला आले. त्यानंतर त्यांनी ऑफिस मधील एका खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजता ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी आले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लागलीच सिल्लोड शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सोनवणे यांचा मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

दरम्यान, याप्रकरणी मयत कृषी सहाय्यक योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन सिल्लोड तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर श्यामलाल बरदे व कार्यालयातील कृषी सहाय्यक किशोर उत्तमराव बोराडे या दोघाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.आर. कायंदे करीत आहेत.

सोनवणे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या डोक्यावर खाजगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, यामुळे आत्महत्या कोणत्या कारणाने केली यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आमचा यात काही दोष नाहीसदर कर्मचारी खूप प्रामाणिक होता. आमचा त्याचा काही वाद नव्हता किंवा आम्ही त्याला त्रास दिला नाही. तरी त्याने असे का केले हे सांगता येत नाही. पण तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी. या गुन्ह्यात आम्हाला विनाकारण गोवण्यात आले आहे.- ज्ञानेश्वर बरदे तालुका कृषी अधिकारी सिल्लोड.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर