आंदोलनाने प्रशासनाला जाग..!
By Admin | Updated: January 6, 2017 23:52 IST2017-01-06T23:48:11+5:302017-01-06T23:52:11+5:30
कुंभारपिंपळगाव : दारूविक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस व राज्य उत्पादन शुल्काच्या पथकास रिकाम्या हातानेच परतावे लागले.

आंदोलनाने प्रशासनाला जाग..!
कुंभारपिंपळगाव : दारूविक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस व राज्य उत्पादन शुल्काच्या पथकास रिकाम्या हातानेच परतावे लागले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव शिवनगावात महिलांनी दारूबंदीसाठी गुरूवारी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले होते. याची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क आणि घनसावंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी गावात जाऊन अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर छापे मारले. परंतु टाकण्यात आलेल्या संयुक्त छाप्यात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पथकात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक जी. पी. साबळे, आर.डी. गायकवाड, बिजुले, आडेप, सहायक पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पुरी, एस.सय्यद, पी. हवाले, गायके, गुजाळ, धोत्रे आदींचा समावेश होता.