आरटीओत वर्षानुवर्षे ‘एजंट’राज

By Admin | Updated: July 21, 2016 01:17 IST2016-07-20T23:56:31+5:302016-07-21T01:17:35+5:30

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटांकडून छोट्या-छोट्या कामांसाठी वाहनधारकांची सर्रास आर्थिक लूट केली जाते.

Agent'Raj 'for RTO years | आरटीओत वर्षानुवर्षे ‘एजंट’राज

आरटीओत वर्षानुवर्षे ‘एजंट’राज

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटांकडून छोट्या-छोट्या कामांसाठी वाहनधारकांची सर्रास आर्थिक लूट केली जाते. आरटीओत मंगळवारी पैसे घेऊनही कामास टाळाटाळ क रणाऱ्या एजंटला एका महिलेने चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे आरटीओतील ‘एजंट’गिरीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, या प्रश्नाकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वर्षानुवर्षे या ठिकाणी ‘एजंट’राज कायम राहत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंट मंडळींनी बस्तान मांडले आहे. तात्काळ कामे करून देण्यात येईल,असे सांगून एजंट वाहनधारकांकडून पैसे उकळतात. कामे लवकरच होण्याच्या आशेने वाहनधारकही स्वत: कामे करण्याऐवजी एजंटकडेच जाण्यास प्राधान्य देतात. वाहनधारकांना एजंटकडे जाण्याची वेळ येऊ, यासाठी गेल्या काही दिवसांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कार्यालयात प्रत्येक कक्षासमोर रांगेत उभे राहण्यासाठी लोखंडी बॅरिके टस्, त्यावर शेड आहेत. प्रत्येक कक्षावर कामाचे स्वरूप, तेथे कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नावाची पाटी बसविण्यात आली आहे. प्रत्येक कामाची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहे. शिवाय मदतीसाठी जनसंपर्क अधिकारी आहेत. एवढे सर्व करूनही एजंटकडे जाण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. कारण यामध्ये कार्यालयातीलच काही जणांकडून अडसर निर्माण केला जातो. त्यामुळे एजंट‘राज’ वाढीला एकप्रकारे हातभार लागत आहे. अशा एजंटांना बाहेरचा रस्ता दाखविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांनीच एजंटकडे जाऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

Web Title: Agent'Raj 'for RTO years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.