शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

बदली धोरणाविरुद्ध औरंगाबादेत शिक्षक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:19 IST

अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देरणरणत्या उन्हात मोर्चा : घोषणांनी दणाणले औरंगाबाद शहर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर ‘२७/२ बदली धोरण विरोध, बदल्यांची खो-खो पद्धत बंद करा,’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत विसर्जन झाले. त्यात शिक्षकनेते संभाजीराव थोरात व प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह अनेकांची घणाघाती भाषणे झाली. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या गावी परळीला हा मोर्चा निघणार होता; परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे तो औरंगाबादला काढण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने व्हॉट्सअ‍ॅपवर उलटसुलट पोस्ट टाकून संभ्रम निर्माण करणाºयांविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघातर्फे तालुकावार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आजच्या सभेत देण्यात आले.शेख इसाक पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध .... चौकटप्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख इसाक पटेल यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताला मार लागला. औषधोपचार सोडून ते आज मोर्चात सहभागी झाले होते व त्यांनी सभेत भाषणही केले. हल्लेखोर कोण, याचा तपास लागला नसून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून अशा हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे पटेल यांनी या सभेत ठणकावून सांगताच ‘भ्याड हल्ल्याचा निषेध असो, हल्लेखोरांना त्वरित अटक झालीच पाहिजे, अशा घोषणांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर दणाणला.प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन नऊगरे, एन.वाय. पाटील, विनोद राऊत, मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, अनुराधा ताकटे, रावसाहेब रोहकले, सिद्धेश्वर पुस्तके, गजानन पटोकार, मोहन भोसले, तात्यासाहेब मेघारे, राम लोहट, भक्तराज दिवाणे, तानजी खोत, आबा जगताप आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.या मोर्चास केंद्रप्रमुख शिक्षक संघ, जि.प. कर्मचारी युनियन आदींनी पाठिंबा दिला होता. जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, दिलीप साखळे, संजय भुमे, जे.के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, संतोष ताठे,संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, बाबासाहेब जाधव, राजेंद्र महाजन, ज्ञानेश सरोते, ईश्वर पवार, राहुल पवार, अशोक डोळस, राजेश पवार आदींनी या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चासाठी शिक्षक मागण्यांचे फलक घेऊन आले होते. शिक्षिकांनी स्कार्फ जवळ ठेवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकºयांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय भगवान महासंघातर्फे करण्यात आली होती. सभास्थळाच्या प्रवेशद्वारासमोर शहाजी नगरे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.धोरणात असा बदल असावा...प्रशासकीय बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्केच कराव्यात, विनंती बदल्यास टक्केवारी नसावी, संवर्ग १, २ व ३ च्या बदल्या करण्यास प्रथम प्राधान्य देऊन त्यांची सोय करावी, बदल्यांतील खो-खो पद्धत बंद करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे धोरण असावे.बदलीसाठी जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याऐवजी शाळेवरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी, एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा त्या शिक्षकाची पाच वर्षे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात येऊ नये, ३० कि.मी.बाहेरील पती-पत्नी एकत्र करताना ३० कि.मी.च्या आतील असणारास विभक्त करू नये.

टॅग्स :Morchaमोर्चाAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकTransferबदली