जबरी चोऱ्या करणारा तीन वर्षानंतर पकडला
By Admin | Updated: September 1, 2014 01:09 IST2014-09-01T00:21:13+5:302014-09-01T01:09:28+5:30
बीड : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाटोदा येथील जबरी चोऱ्या करणारा आरोपी युवराज अभिमान जाधव याच्या मुसक्या आवळल्या

जबरी चोऱ्या करणारा तीन वर्षानंतर पकडला
बीड : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाटोदा येथील जबरी चोऱ्या करणारा आरोपी युवराज अभिमान जाधव याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आरोपी युवराज जाधव व त्याच्या सहकाऱ्याने २०११ मध्ये गुजरात राज्यातील वनथळी येथून ९ लाख रुपयांची बॅग पळवली होती. त्यानंतर आॅक्टोबर २०११ मध्ये धस पिंपळगावचे उपसरंपच देविदास शेंडगे यांची १ लाख ३७ हजार रुपयांची बॅग पळवली होती. तेव्हांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. शुक्रवारी चुंबळी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थागुशाचे सपोनि भारत राऊत, संजय खताळ, बबन राठोड, मोहन क्षीरसागर, गणेश दुधाळ, बाबासाहेब सुरवसे, चालक रशीद खान यांनी केली. (प्रतिनिधी)