शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

३ महिन्यांनंतर अर्थसंकल्पाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:56 PM

शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मागील तीन महिन्यांपासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार, दि.११ जून रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपाची आज सर्वसाधारण सभा : १,५०० कोटींमध्ये आणखी किती वाढ होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मागील तीन महिन्यांपासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार, दि.११ जून रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रशासनाने स्थायी समितीला १,२७४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायीने त्यात तब्बल २२९ कोटींची वाढ केली. फुगीर अर्थसंकल्प १,५०३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आता सर्वसाधारण सभा त्यात आणखी किती वाढ करणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात मनपाच्या तिजोरीत ७८७ कोटी ४५ लाख ५५ हजार रुपये आले. दरवर्षी तिजोरीत किती पैसे येतात हे माहीत असतानाही मनपा प्रशासनाने तब्बल १,२७४ कोटींचा फुगीर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला १,५०३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मागील महिन्यात सादर केला. सर्वसाधारण सभा आणखी १०० ते १५० कोटींची वाढ करणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प मनपाच्या मूळ उत्पन्नापेक्षा दुप्पट होणार आहे. १,६०० कोटींपर्यंत अंतिम अर्थसंकल्प जाईल, असा अंदाज आहे.नागरिकांची निव्वळ फसवणूकमहापालिका दरवर्षी अर्थसंकल्प सादर करीत असते. या अर्थसंकल्पात विकासकामांचा अक्षरश: डोंगर रचण्यात येतो. प्रत्यक्षात वर्षअखेरीस अर्थसंकल्पातील पाचही कामे होत नाहीत. नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात सुचविलेली कामे ६० ते ७० टक्केहोतात. शहरासाठी सुचविण्यात आलेल्या कामांकडे सत्ताधारी आणि विरोधकही दुर्लक्ष करतात. महापालिकेकडून विकासकामांच्या नावावर दरवर्षी औरंगाबादकरांची निव्वळ फसवणूक करण्यात येते.आर्थिक क्षमताच नाहीपालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ७०० कोटी रुपये येतात. त्यातील ४५० ते ५०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पगार, विजेचे बिल आदींमध्ये खर्च होतो. विकासकामांसाठी किमान २०० कोटी रुपये उरतात. त्यातही ११५ नगरसेवकांची ओढाताण सुरू असते. अनुभवी नगरसेवक आपले कौशल्य पणाला लावून निधी ओढून घेतात. नवीन नगरसेवक अंदाजपत्रक करण्यातच मग्न असतात.स्पील ओव्हरचे कायमनपा आयुक्तांकडे सध्या ८५० पेक्षा अधिक विकासकामांच्या फायली तुंबल्या आहेत. अर्थसंकल्पात समाविष्ट कामही पुढील वर्षीच्या स्पीलमध्ये टाकण्यात येते. वर्क आॅर्डर झालेली असेल, काम सुरू असेल, तरच स्पीलमध्ये ही कामे घ्यावीत, असे निकष आहेत. .

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका