शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:22 IST

नैराश्य, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पती-पत्नीचे टोकाचे पाऊल

- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( औरंगाबाद) : आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक  घटना तालुक्यातील धावडा येथे घडली. या घटनेने गाव सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. इतके टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी  झाली आहेत.

सुरेखा संतोष दळवी ( ४१) व संतोष किसन दळवी ( ४५ दोघे रा.धावडा) असे मृत पती- पत्नीचे नाव आहे. सुरेखाने दोन दिवसांपूर्वी २० फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. १८ मध्ये विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.

कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊलया कुटुंबांवर बँकेचे व बचत गटाचे कर्ज होते. तिन एकर शेती. मार्च महिना जवळ आला. शेती मालाला भाव नाही. अशात कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. या नैराश्यातून त्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

मुल झाली पोरकीमयत पती- पत्नी पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीच लग्न झालेले आहे. त्यांच्या आत्महत्येने ही मुल पोरकी झाली असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. या कुटुंबाला आधाराची गरज असून यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

अद्याप कारण स्पष्ट झाले नाहीदोघा पती पत्नीने आत्महत्या केली आहे मात्र त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पोलीस या घटनेचा तपास करत आहे.त्यांच्यावर कर्ज होते  नैराश्य व आर्थिक विवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती आहे तपासाअंती काय ते कळेल.- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या