खुलताबाद: वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील दुस-या सोमवारी मोठी गर्दी झाल्याने रांगेत दर्शनासाठी दीड तास लागत होता. दुसरा श्रावण सोमवारी पहाटेपासूनच श्री घृष्णेश्वर मंदीरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे वेरूळ परिसरातील भाविकांना छोट्या गेटने प्रवेश देण्यात आला होता. खुलताबाद पोलीसांनी दोन दिवसांपासून भाविकांना तत्काळ दर्शन देण्याच्या उद्देशाने फसवणूक करणाऱ्या दलाला विरोधात कारवाई सुरू केल्याने श्रावण सोमवारी मात्र दलाल मंदीर परिसरातून गायब झाल्याचे मंदीर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे यांनी सांगितले.
रांगेतून आलेल्या भाविकांना दर्शन झाल्यानंतर पाठीमागील उत्तरकडील दरवाजातून बाहेर काढण्यात येत असल्याने मंदीर परिसरात भाविकांची गर्दीने कोंडी झाली नाही. दुपारपर्यंत दर्शनाच्या रांगा या वाहनतळापर्यंत पोहचल्या होत्या. शनिवार रविवार, सोमवार हे तीन दिवस मंदीर गाभा-यात अभिषेक, महापुजा बंद असल्याने पटापट दर्शन होत असल्याचे ही यावेळी मंदीर प्रशासनाने सांगितले.
एजंटाविरोधात कारवाईची मोहीम सुरूचश्रावणातील दुसरा श्रावण सोमवार निमित्त मंदीर परिसरात शांतता व सुरळीत दर्शन सुरू असून भाविकांकडून पैसे घेवून दर्शनाचे अमिष दाखविणा-या एजंट( दलाल) विरोधात कारवाई सुरू असून मंदीर परिसरातून हे दलाल गायब असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सांगितले. मंदीर परिसरात १३ अधिकारी, ७५ पोलीस कर्मचारी, ८० होमगार्ड असा पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला आहे.
दलालांना पोलीसांची समजवेरूळ श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात तत्काळ दर्शनाचे अमिष दाखवून भाविकांची फसव़णूक करणाऱ्या १५ दलालांची यादी पोलीसांनी तयार केलेली असून या पंधरा जणांना खुलताबाद पोलीस ठाण्यात बोलावून चांगलीच समज दिल्याचे एका पानफुल विक्रेत्यांनी सांगितले. घृष्णेश्वरांच्या मुर्तीवरच कँरीबँग, फुलांच्या टोपल्या, मुर्तीची पवित्रता भंग श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अनेक भाविक कँरीबँमध्ये पुजेचे साहित्य तसेच फुलविक्रेत्यांकडून टोपलीत बेलपत्रे, पानफुल, प्रसाद घेतात मात्र पुजेच्या दरम्यान कँरीबँग व टोपल्या मुर्तीवर ठेवून पुजा करून त्या तशाच मुर्तीवर ठेवून निघून जात असल्याने मुर्तीची पवित्रता भंग होत असल्याने अनेक भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याकडे मंदीर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.