शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:10 IST

आपल्या ग्रामीण शैलीत माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या टीकेचा देखील भुमरे यांनी खरपूस समाचार घेतला.

औरंगाबाद: आमच्या उठावामुळे ठाकरे कुटुंबाला मोठा फायदा झाला. उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील बेल्ट गेला, ते सरळ उभे राहू लागले. आदित्य, तेजस, रश्मी ताई घराबाहेर आल्या. यांना असा कोणता डॉक्टर भेटला की सारे आजारच पळाले, असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी आज उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आपल्या ग्रामीण शैलीत माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या टीकेचा देखील भुमरे यांनी खरपूस समाचार घेतला.

औरंगाबादच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचा सत्कार सोहळा आणि हिंदू गर्जना मेळावा आज संत एकनाथ रंगमंदिरात झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री संदीपान भुमरे यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. आपल्या ग्रामीण शैलीत उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर भुमरे यांनी जोरदार टीका करत आम्ही का उठाव केला याच्या कारणांचा पाढाच वाचून दाखवला. भूमरेंच्या ग्रामीण भाषेतील भाषणाला टाळ्या आणि हास्याने चांगलीच दाद मिळाली  

ठाकरेंना असा कोणता डॉक्टर मिळाला एकनाथ शिंदे यांच्यामुळे उध्दव ठाकरे यांचे आजार दूर झाले, गळ्याचा पट्टा गेला. सरळ उभे राहिले, उध्दव साहेब बाहेर आले आदित्य आणि तेजस बाहेर आला, रश्मी ताई बाहेर आल्या. एकनाथ शिंदे यांच्यामुळे घरातील आजार गेले किती फायदा झाला त्यांचा. ठाकरे यांनी अपक्ष आमदाराला सोबत घेतले, मंत्रिपद, पालकमंत्री पद दिले. यासाठी त्यांनी किती खोके घेतले. खरे गद्दार तर मातोश्रीवर आहेत.

खैरेंना किंमत आली आज आमच्यावर टीका करणारे खैरे तेव्हा म्हणायचे मातोश्री खूप वाईट आहे. मी नेता असूनही मला प्रवेश बंद आहे. मात्र, आमच्या उठवानंतर आता त्यांना किंमत आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी जिल्ह्यातील आमदारांसोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही खैरेंनी २० लाख रुपये घेतले. त्यांना लोकभेत कोणी पाडले आधी याचा विचार करावा.

दानवेंनी निवडणूक लढवावी सभा आम्ही घेयाच्या पण त्याचे फोटो उद्धव ठाकरेंना दाखवून अंबादास दानवे त्याचे श्रेय घेत. आम्ही पैसे दिले, गाड्या लावल्या, माणस आणली आणि नाव यांचं झाल. त्याने खासदारकी, आमदारकी लढवावी. खैरे आणि दानवेत बाईट देण्याची स्पर्धाच लागली आहे.  

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद