दीड हजारांची लाच घेताना निमगावच्या ग्रामसेविकेला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2015 23:41 IST2015-12-19T23:33:06+5:302015-12-19T23:41:05+5:30
भोकरदन/हसनाबाद : तालुक्यातील निमगाव येथील ग्रामसेविकेला शनिवारी दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.

दीड हजारांची लाच घेताना निमगावच्या ग्रामसेविकेला पकडले
भोकरदन/हसनाबाद : तालुक्यातील निमगाव येथील ग्रामसेविकेला शनिवारी दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.
निमगाव येथील तक्रारदार गौतम सुखदेव साळवे यांना ग्रामसेविका सरस्वती शेळके यांच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्राची मागणी केली होती. तेव्हा शेळके यांनी तक्रारदाराने पूर्वी करून दिलेल्या फेरचे १५०० रूपये दिले नसल्याचे सांगून पूर्वीच्या कामाचे पैसे तसेच घरपट्टी व नळपट्टीचे ४५० रूपये आणून देण्याची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने साळवे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या क्रंमाकावर संपर्क साधून तक्रार करण्याचा सल्ला मागितला . तेव्हा पोलिस उपअधीक्षक प्रविण मोरे यांनी स्वत: तक्रारदाराशी संपर्क साधून त्याच्या शेतात येऊन तक्रार घेत सापळा रचला. त्यानंतर सापळा रचून ग्रामसेविका शेळके यांना शनिवारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात दीड हजार रूपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी शेळके यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ डी़ एस़ स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक एस़एल़मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक प्रविण मोरे , किशोर पाटील, संजय उदगीरकर, रामंचद्र कुदर, प्रदिप उबाळे यांनी केली. (प्रतिनिधी)
लाचखोरीला लगाम लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तक्रारदाराना जालना कार्यालयात येण्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करुनदिल्या आहेत. त्यामध्ये तक्रारदाराला एखाद्या कामासाठी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी टोल फ्री कं्रमाक १०६४ वर संपर्क साधावा.
४तसेच ०२४८२ २२०२५० या क्रंमाकावर सर्पक साधला तरी सुध्दा तक्रार देण्यासाठी जालना येथे येण्याची आवश्यकता नाही या विभागाचे पथक तक्रारदाराच्या दारात जाऊन तक्रार घेऊन कार्यवाही करीत असून, त्याच पद्धतीने आजचा सापळा यशस्वी करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रविण मोरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
भोकरदन : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या भोकरदन उपविभागातील शाखाअभियंता रमेश बालाजी पडघन यास १५०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
४भोकरदन तालुक्यातील तळेगाव दाभाडी येथील तक्रारदारास रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. घरकुलाचे अंतिम मुल्यमापन २५ हजारांचे करून देण्यासाठी तक्रारदार हे अभियंता पडघन यांच्याकडे गेले असता या कामांसाठी १५०० रूपयांची मागणी केली.
४दरम्यान लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एका पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा रचला. शनिवारी घरकुलांची मोजणीकरून मुल्यांकणाचे काम करताना घरकुलाजवळच तक्रारदाराकडून १५०० रूपये घेताना पडघन यास रंगेहात पकडण्यात आले.
४ही कारवाई पो. नि. व्ही. बी. चिंचोले, पो. नि. विनोद चव्हाण, कर्मचारी जमधडे पाटील, संजय राजपूत, संदीप लव्हारे यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली.