सहा दिवसानंतर टाळे उघडले

By Admin | Updated: May 8, 2014 23:43 IST2014-05-08T23:42:00+5:302014-05-08T23:43:13+5:30

जालना : खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे पगार अदा करणार्‍या येथील वेतन पथक कार्यालयास लावलेले टाळे संबंधित घरमालकांनी गुरूवारी काढले.

After six days, the opening was opened | सहा दिवसानंतर टाळे उघडले

सहा दिवसानंतर टाळे उघडले

जालना : खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे पगार अदा करणार्‍या येथील वेतन पथक कार्यालयास लावलेले टाळे संबंधित घरमालकांनी गुरूवारी काढले. या वेतन पथक १३ महिन्यांचा किराया संबंधित जागा मालकांना अदा केलेला नव्हता. त्यामुळे शुक्रवारी जागा मालकाने या कार्यालयास टाळे ठोकले. त्यामुळे ७८ शाळामंधील ६४१ प्राथमिक शिक्षकांचे वेतन अडचणीत आले होते. गुरूवारी वेतन पथकाचे अधीक्षक एम.डी. आव्हाड यांनी जागा मालकांस लेखी आश्वासन दिल्यानंतर हे टाळे उघडण्यात आले. या कार्यालयात एकूण सहा कर्मचारी आहेत. सहा दिवस त्यांना कार्यालयाबाहेर प्रवेशद्वाराजवळ बसून रहावे लागले. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन कांबळे यांनी बुधवारी येथे भेट दिली. मात्र कार्यालयाला लावलेले टाळे पाहून ते परतले. शासनाने आता वेतनाची पद्धत आॅनलाईन केलेली असली तरी अशा कारभारामुळे वेतन विलंबानेच होत असल्याने खाजगी संस्थांवरील प्राथमिक शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After six days, the opening was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.