छाननीमध्ये सात अर्ज बाद

By Admin | Updated: April 10, 2015 00:37 IST2015-04-10T00:05:26+5:302015-04-10T00:37:07+5:30

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी छाननीदरम्यान पाच जणांचे सात अर्ज बाद झाले आहेत.

After scrutiny seven applications | छाननीमध्ये सात अर्ज बाद

छाननीमध्ये सात अर्ज बाद


बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी छाननीदरम्यान पाच जणांचे सात अर्ज बाद झाले आहेत. तर तीन अर्जावरचा निर्णय शुक्रवारी जाहीर होणार आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज स्वीकारल्यानंतर गुरूवारी छाननी करण्यात आली. १९ जागांसाठी १९९ अर्ज प्राप्त झाले हाते. त्यात सेवा सोसायटी, महिला, अ.जा.ज, वि.जा.भ.ज., इ.मा.व., कृषी पणन, नागरी बँक यांचा समावेश आहे.
पाच जणांचे अर्ज झाले बाद
बाबासाहेब गोपाळघरे यांच्या अर्जात सूचक नव्हते तसेच अनुमोदक नव्हते. अनुभवाचे प्रमाणपत्र नव्हते. या कारणावरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. बबन संतराम जगताप यांनी कृषी व पणन मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. नागरी बँक मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले सुभाष सारडा, महिला गटात मंगल मोरे व वि.जा.भ.ज. प्रवर्गातून अर्ज दाखल केलेले मधुकर ढाकणे यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. या तिघांवर अपहार झाल्याचा आरोप असल्याने ८८ अन्वये त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले.
दरम्यान, उस्मान बेगम फतेहउल्ला यांनी अनुभव प्रमाणपत्र सादर केले नाही. या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज विचाराधीन आहे. वडवणी येथील मोहन सावंत यांनी सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे. अंतिम मतदार यादी जाहिर झाल्यानंतर त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे. माधव मोराळे यांचाही अर्ज विचाराधीन आहे. शुक्रवारी सकाळी ११ नंतर यादी जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After scrutiny seven applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.