एक महिन्यानंतर अंतिम आराखडे सिडको, नगररचना कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:41 IST2017-11-10T00:41:39+5:302017-11-10T00:41:45+5:30
डको प्रशासनाने शहरालगतच्या २८ खेड्यांतील १५ हजार १८४ हेक्टर (३५ हजार एकर) जागेत नवीन उपनगर विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला चार वर्षांनंतर शासनाने मंजुरी दिली आहे

एक महिन्यानंतर अंतिम आराखडे सिडको, नगररचना कार्यालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको प्रशासनाने शहरालगतच्या २८ खेड्यांतील १५ हजार १८४ हेक्टर (३५ हजार एकर) जागेत नवीन उपनगर विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला चार वर्षांनंतर शासनाने मंजुरी दिली आहे. त्याची अधिसूचना जारी केल्यानंतर एक ते दीड महिन्यांनी पाच झोनचे अंतिम आराखडे सिडको आणि नगररचना कार्यालयात नागरिकांसाठी खुले होणार आहेत.
८ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी झालर क्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याच दिवशी तो आराखडा जनतेसाठी खुला झाला होता. अधिसूचनेमुळे शासनाने आराखडा स्वीकारला आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पाच झोनचे नकाशे गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतरच ते नागरिकांसाठी खुले होतील. ९९ टक्के आराखड्यात काहीही बदल होणार नाही. १ टक्का बदल होण्यासाठी नगररचना सहसंचालक कावळे यांच्या कार्यालयात आक्षेपांवर सुनावणी होईल. आक्षेपांसाठी आराखडे प्रकाशित झाल्यानंतर मुदत देण्यात येणार आहे. आता सिडकोच्या विकास आराखड्यात ५ झोन आहेत. सातारा-देवळाई ही गावे मनपा हद्दीत गेली आहेत. ५६० बदलांना मान्यता देण्यात आली असून, त्यातील काही बदल स्वीकारले आहेत तर काही रद्द करण्यात आले आहेत.