नोटिशीनंतरही रस्त्याचे काम पुन्हा ‘तसेच’ सुरू
By Admin | Updated: May 7, 2014 00:17 IST2014-05-07T00:16:27+5:302014-05-07T00:17:16+5:30
गोविंद इंगळे , निलंगा निलंगा शहरातील भगिरथी नगरमध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याबाबत नगरसेवकाने मुख्याधिकार्यांकडे तक्रार केली़

नोटिशीनंतरही रस्त्याचे काम पुन्हा ‘तसेच’ सुरू
गोविंद इंगळे , निलंगा निलंगा शहरातील भगिरथी नगरमध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याबाबत नगरसेवकाने मुख्याधिकार्यांकडे तक्रार केली़ याबाबत संबंधित गुत्तेदाराला काम बंद करण्याची नोटीस देऊनही काम सुरुच ठेवल्याने गोंधळ उडाला आहे़ भगीरथ नगर येथे नगरपालिकेच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरु आहे़ हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे़ याबाबत ५ मे रोजी वसुंधरा शिंंगाडे या नगरसेविकेने मुख्याधिकार्यांकडे लेखी तक्रार केली़ त्याची दखल घेऊन नगरपालिका अभियंत्यांनी कामाची पाहणी केली़ परंतु, सदरील काम नियम व अटीप्रमाणे होत नाही़ खडीकरण मजबुतीकरण व डांबराचा वापर कमी प्रमाणात असून, भर पावसात हे काम सुरु होते़ चिखलावरच डांबरीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच हे काम बंद करण्याचे आदेश नगरपरिषदेच्या वतीने अभियंत्यांनी दिले़ मात्र सदरील कामाच्या ठिकाणाहून अभियंत्यांनी पाठ फिरवताच गुत्तेदारांनी पुन्हा काम सुरु केले़ याची माहिती होताच नगरसेविका वसुंंधरा शिंगाडे व विद्या सगरे यांनी वारंवार फोन करून मुख्याधिकार्यांना सांगितले़ तरी पुन्हा काम चालू केले, असा प्रकार कायम चालूच राहिला़ मात्र मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी राज मजूर संस्थेला नोटीस दिली व सदरील काम अंदाजपत्रकीय तरतुदी, शर्ती व अटी नियमानुसार होत नाहीत़ फलक नाही, दबाई व्यवस्थित होत नाही, आदी तक्रारीबाबत खुलासा करावा, अन्यथा नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आली होती़