शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मिळताच कुख्यात गुंड टिप्यासह टग्या, बादशहाकडून लूटमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:02 IST

टिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरसह परिसरात दहशतीच्या जोरावर लुटमार करणारा कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख याच्यासह टग्या, बादशाहसह सातजणांच्या टोळीने एकास लुटले. दुचाकीसह २ लाख ५० हजार रुपये बळकावल्याचा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास साईनगर परिसरात घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींमध्ये टिप्या (रा. विजयनगर), भूषण, अर्जुन पाटील (रा. राजे चौक), टग्या, बादशहासह दोन अनोळखी साथीदारांचा समावेश आहे. शेख अझर शेख गनी (रा. गारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मोपेडवरून (एमएच २० एफएक्स २८२४) मित्र अब्रार शेख हसन याच्यासह बीड बायपासवरील स्पाइस ट्री हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी फिर्यादीच्या खिशात अडीच लाख रुपये होते. फिर्यादीसह मित्र हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच टिप्यासह अर्जुन पाटील हे दोघे समोरच्या टेबलवर दारू पीत बसलेले होते. टिप्याने अर्जुनच्या कानात काहीतरी सांगितल्यानंतर तो निघून गेला. काही वेळाने टिप्यासह दोघे हॉटेलबाहेर आले. शेख अझर स्वत:च्या, तर मित्र टिप्याच्या गाडीवर पाठीमागे बसला. टिप्याने अब्रारला दुचाकी साईनगरकडे घेण्यास सांगितले. तिघे १० वाजण्याच्या सुमारास तेथे आले. त्या ठिकाणी आधीच टग्या, बादशहासह आणखी दोन अनोळखी लोक बसले होते. काही वेळातच टिप्याने अकारण अझरला चापट मारली. मारहाणीचे कारण विचारताच दोघांना चौघांनी मारहाण सुरू केली. खिशातील सर्वच पैसे मागितले. नकार देताच टिप्याने फोन करून अर्जुन पाटील आणि भूषण यांना तलवार आणण्यास सांगितले. काही मिनिटांतच दोघे तलवार घेऊन आले. टिप्याने तलवार हातात घेत खिशातील अडीच लाख रुपये हिसकावले. अझर व अब्रार हे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच सर्व आरोपींनी दोघांना अडवले. तलवारीचा धाक दाखवून सकाळपर्यंत एक लाख रुपये घेऊन आला नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. टग्याने अझरची मोपेड दुचाकी जबरदस्तीने नेली. गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

२५ गुन्हे अन् नागरिकांमध्ये दहशतटिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सहकाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांसह इतरांना धमकावतो. त्यांच्याकडून खंडणी उकळतो. त्याशिवाय जीवघेणे हल्लेही करतो. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय आतापर्यंत पाच प्रतिबंधात्मक कारवाया केलेल्या आहेत. दोन वेळा एमपीडीए ॲक्टअंतर्गत कारागृहातही ठेवण्यात आलेले आहे. तरीही त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वेगाने वाढत आहे.

आठ महिन्यांनी कारागृहाबाहेरटिप्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये सेव्हन हिल येथे पोलिसांसमोरच हाणामाऱ्या करून लुटमार केली होती. तेव्हा त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. आठ महिन्यांनंतर टिप्या कारागृहाबाहेर आला आहे. त्याने बाहेर आल्यानंतर पुन्हा लुटमार सुरू केली. त्याच्या अटकेसाठी पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर