शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:57 PM

घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देघाटी : डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप, बालिका व्हेंटिलेटरवर

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.केतकी बालाजी घोरपडे (रा. गारखेडा) असे या बालिकेचे नाव आहे. यासंदर्भात तिचे वडील बालाजी घोरपडे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्याकडे एका अर्जाद्वारे तक्रार दिली आहे. उजव्या डोळ्याच्या तिरळेपणावरील उपचारासाठी शनिवारी केतकीला घाटीत दाखल करण्यात आले. तिच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रियेसाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास केतकीला शस्त्रक्रियागृहात नेण्यात आले. दरम्यान तीन वाजेच्या सुमारास केतकीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.भूल दिल्यानंतर तिला खोकला लागला. अस्थमासारखा अटॅक आला. त्यामुळे तिला भुलीची रिअ‍ॅक्शन झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले. या प्रकारामुळे शस्त्रक्रिया रद्द करून केतकीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप बालाजी घोरपडे यांनी केला आहे.घाटीतील नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर म्हणाल्या, या बालिकेवर युनिट-३ यांच्याकडून उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेपूर्वी तिला भूल बसत नसल्याची आणि त्रास होत असल्याची माहिती प्राप्त झाली. या सगळ्याची मी माहिती घेतली. प्रकृती बिघडल्यामुळे बालिका व्हेंटिलेटवर आहे.कारण सांगता येणार नाहीया बालिकेला शस्त्रक्रियेपूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. परंतु अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याचे कारण आताच सांगता येणार नाही.-डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद