पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गो एअर’चे विमान दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:40 PM2019-06-04T19:40:03+5:302019-06-04T19:41:00+5:30

चार खाजगी बसने प्रवासी रात्री उशिरा मुंबईला रवाना

After five hour efforts, the 'Go Air' plane is ready to fly | पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गो एअर’चे विमान दुरुस्त

पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गो एअर’चे विमान दुरुस्त

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अचानक आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झालेले गो एअर कंपनीचे पाटणा-मुंबई विमान सोमवारी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुरुस्त होऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या विमानातील प्रवासी रविवारी रात्री उशिरा चार खाजगी बसने मुंबईला गेले. 

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. अशा परिस्थितीत विमानातील वातानुकूलित यंत्रणाही बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. परंतु वैमानिकाने प्रसंगावधान राखून औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे १६४ प्रवासी बालंबाल बचावले. या सगळ्या परिस्थितीनंतर प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गो एअरची कोणतीही व्यवस्था नसल्याने एअर इंडियाच्या यंत्रणेची मदत घेण्यात आली. विमानातून उतरल्यानंतर विमानतळावर प्रवाशांच्या अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. विमान दुरुस्त होईल अथवा अन्य विमानाची सोय होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर या दोन्हीपैकी काहीही झाले नाही. विमान दुरुस्तीसाठी कंपनीचे अभियंते, तंत्रज्ञांना येण्यास विलंब झाला. अशा परिस्थितीत प्रवाशांना खाजगी बसने मुंबईला नेण्याचे नियोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चार खाजगी बसद्वारे प्रवासी रवाना झाला. मुंबईच्या प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशी होणार
चिकलठाणा विमानतळावर लँडिंग झाल्यानंतरही वैमानिक विमानातच बसून वरिष्ठ पातळीवर संवाद साधत होते. सोमवारी सकाळी सहा वाजता दाखल झालेल्या इंजिनिअर, तंत्रज्ञांनी विमान दुरुस्त केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे विमान मुंबईकडे झेपावले. जे वैमानिक आले होते, त्यांनीच विमान नेले. या सगळ्या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याचीही माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: After five hour efforts, the 'Go Air' plane is ready to fly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.