शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

दारू पिल्यानंतर बिनसल्याने केला खून; हत्या करताना फोटोही काढले, मृताचा चेहरा दगडाने ठेचला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 20:06 IST

एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा आरोपी मृताची गाडी घेऊन फरार झाल्याची माहिती

गंगापूर : तालुक्यातील ढोरेगाव शिवारात गट क्रमांक १२ मध्ये चेहरा विद्रूप झालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुनील प्रकाश जमधाडे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी अक्षय बापू वीर (२१, रा.रांजणगाव खुरी ता.पैठण) या आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य एकजण फरार आहे. 

वाळूज औद्योगिक विकास महामंडळच्या रेल्वेस्टेशन कार्यालयात पाणी पुरवठा विभागातील शिपाई सुनील प्रकाश जमधाडे (४०, रा.पाटोदा औरंगाबाद ह.मु.शरणापुर)  यांचा मृतदेह संशयित रित्या तालुक्यातील ढोरेगाव शिवारात गट क्रमांक १२ मध्ये सोमवारी (२) रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला होता. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञाताचा विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात, रविवारी वाळूज परिसरातील एका वाईन शॉपवर अक्षय वीर आणि सुनीलसोबत दारू खरेदी करत असल्याचे सीसीटीव्हीत फुटेजमध्ये दिसून आले. यावरून पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन विचारपूस केली .पोलिसी खाक्या दाखवताच अक्षय याने एका मित्रासोबत मिळून सुनीलचा खून केल्याची कबुली दिली. 

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप दूबे, सहपोनि साईनाथ गीते, पोलीस ठाणे पैठण येथील पोह गणेश खंडागळे सय्यद झिया, सफी दगडू जाधव, पोह लहू थोटे, नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, संजय घुगे, पोना दिपक सुरोसे, उमेश बकले, वाल्मीक निकम, संतोष डमाळे, पोकों ज्ञानेश्वर मेटे यांनी केली. 

दुसरा आरोपी मृताची गाडी घेऊन फरार सुनील जमदाडेसह ढोरेगावकडे जात असताना रस्त्यात भांडण झाले. यामुळे अक्षय आणि त्याच्या सोबत्याने सुनीलला काठीने मारहाण केली. ढोरेगाव येथील शेतात नेऊन माझ्या सहकार्याने त्याचा गळा आवळला, चेहऱ्याची ओळख पटू नये म्हणून तोंड दगडाने ठेचल्याची कबुली अक्षयने दिली. दुसरा साथीदार मृताच्या दुचाकीसह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद