शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत छत्रपती संभाजीनगरची जागा कुणाला यावर ठरणार ठाकरे गटाचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 11:28 IST

जागा शिवसेनेला की भाजपच लढवणार? ठाकरेंना प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : महायुतीमध्ये औरंगाबाद मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार की भाजपच ही जागा लढवणार, यावर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महाविकास आघाडीमध्ये औरंगाबाद मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. मात्र ठाकरे गटाचे अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराबाबत जाहीरपणे काहीही सांगितले नाही. महायुतीमध्ये मात्र ही जागा भाजपच लढवणार असल्याचे चित्र आधीपासून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ५ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या सभेत ‘इथून दिल्लीला कमळ पाठवा’ असे आवाहन केले होते. त्यावेळी औरंगाबाद मतदारसंघ भाजप लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी औरंगाबाद मतदारसंघावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये या जागेवरून विवाद होऊन निर्णय प्रलंबित राहिला. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरील चर्चा अजूनही सुरू आहे.

महायुतीमध्ये हे चित्र असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे ही दोन नावे उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. दोन्ही नेत्यांनी उमेदवारीबाबत दावा केला आहे. मात्र ठाकरे गट महायुतीमध्ये जागा कुणाला सुटते याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

जातीचे समीकरणमहायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जागा गेल्यास ओबीसी उमेदवार असण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मराठा उमेदवार दिला जाईल, अशी अटकळ आहे. जागा शिंदे गटाला गेल्यास उमेदवार मराठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गट मराठेतर उमेदवार देईल, असे मानले जात आहे. महायुतीदेखील ठाकरेंचा उमेदवार कोण याच्या प्रतीक्षेत असावी, अशीही एक शक्यता दिसत आहे.

विविध पक्षांचे स्पर्धक उमेदवारभाजप : डॉ. भागवत कराड, अतुल सावेशिवसेना (शिंदे गट): संदीपान भुमरे, विनोद पाटीलशिवसेना (ठाकरे गट) : चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेएमआयएम : इम्तियाज जलील (नाव निश्चित)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४