पाठलाग करून सशस्त्र पाच दरोडेखोर पकडले
By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-29T23:52:40+5:302014-09-30T01:27:31+5:30
कोळगाव : गेवराई तालुक्यातील श्रृंगारवाडी येथे रविवारी रात्री उशिरा पोलीस व गावकऱ्यांनी मिळून दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले़ पाच दरोडेखोर पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत केली आहेत़

पाठलाग करून सशस्त्र पाच दरोडेखोर पकडले
कोळगाव : गेवराई तालुक्यातील श्रृंगारवाडी येथे रविवारी रात्री उशिरा पोलीस व गावकऱ्यांनी मिळून दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले़ पाच दरोडेखोर पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत केली आहेत़
सचिन राजेंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, सर्जेराव पवार, प्रल्हाद सर्जेराव पवार, पवन सर्जेराव पवार (सर्व रा़ कोळगाव, ता़ गेवराई) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे़ चकलांबा ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर यांना श्रृंगारवाडी येथे दरोडेखोर दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सापळा लावला़ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी धूम ठोकली़ मात्र पोलीस, ग्रामस्थांनी त्यांचा पिच्छा पुरवला़ अखेर ते तावडीत सापडले़ त्यांच्याकडे दोन दुचाकी, धारदार शस्त्रे आढळून आली़ शिवाय दरोड्याचे साहित्य तसेच रोख रकमेसह एक लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़ चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार ए़ एऩ लांडगे हे तपास करीत आहेत़ (वार्ताहर)