बजरंग सोनवणे यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज बाद
By Admin | Updated: December 24, 2016 00:58 IST2016-12-24T00:57:01+5:302016-12-24T00:58:30+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत शुक्र वारी उमेदवारी अर्जाच्या झालेल्या छाननी नंतर जि. प. सभापती बजरंग सोनवणे यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले.

बजरंग सोनवणे यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज बाद
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत शुक्र वारी उमेदवारी अर्जाच्या झालेल्या छाननी नंतर जि. प. सभापती बजरंग सोनवणे यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. भाजपचे रमेश आडसकर यांना जीवदान मिळाले. आता रिंगणात ८० उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत.
एकूण १८ हजार ९२४ सभासद संख्या असलेल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई, केज व लातूर जिल्ह्यातील रेणापूर हे आहे.
कारखाना संचालक पदांच्या २५ जागांसाठी २१ डिसेंबर पर्यंत ९२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरूवारी आक्षेप व छाननी प्रक्रिया झाली. या आक्षेप नोंदणीत रमेशराव आडसकर बजरंग सोनवणे, बालासाहेब बोराडे, नरसू सावंत, राम नखाते, विश्वासराव पाटील, लालासाहेब ठोंबरे या सात जणांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला. शुक्र वारी या आक्षेपांवर निर्णय झाला. यात बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज ते स्वत: एका साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक असल्याने अर्ज बाद ठरविण्यात आला. बालासाहेब पंढरीनाथ बोराडे, नरसु विठोबा सावंत यांचे उमेदवारी अर्ज थकबाकीमुळे बाद ठरले. दामोदर भानुदास कदम, योगेश सुरेश शिंदे, अशोक रावसाहेब देशमुख, बाबासाहेब रंगनाथ शिनगारे, अमरसिंह नारायणराव पाटील, आश्रुबा संतराम चोरमले, सुरेखा विजयकुमार कदम यांचे उमेदवारी अर्ज अपूर्ण शेअर्समुळे बाद झाले.
दुसरीकडे, रमेश आडसकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र या सर्व आक्षेप प्रक्रियेतून आडसकर सहीसलामत सुटले. आता निवडणूक रिंगणात २५ संचालकांच्या जागेसाठी ८० उमेदवार आखाड्यात आहेत. (वार्ताहर)