अखेर ‘त्या’ रस्त्याचे काम सुरू

By Admin | Updated: June 24, 2014 00:34 IST2014-06-24T00:34:49+5:302014-06-24T00:34:49+5:30

औैराद शहाजानी : रस्ता दुरुस्तीसाठी मंजुरी मिळूनही संबंधित ठेकेदाराने खडीचे ढिगारे टाकल्यामुळे काम रखडले होते.

After all, the work of 'those' roads started | अखेर ‘त्या’ रस्त्याचे काम सुरू

अखेर ‘त्या’ रस्त्याचे काम सुरू

औैराद शहाजानी : लातूर- बीदररोड ते तगरखेडा, हलसी, तुगाव या महाराष्ट्र-कर्नाटक दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी मंजुरी मिळूनही संबंधित ठेकेदाराने खडीचे ढिगारे टाकल्यामुळे काम रखडले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच रविवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
लातूर-बीदर रोड ते तगरखेडा, हलसी, तुगाव या महाराष्ट्र-कर्नाटक दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या कामकाजासाठी हे काम मिळालेल्या ठेकेदाराने खडीचे ढिगारेही टाकले; परंतु या रस्त्याच्या कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. परिणामी, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या बससेवा बंद ठेवाव्या लागल्या. तसेच या भागातील शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्याबाबत ७२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण झाले. तर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना सोयीचे होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: After all, the work of 'those' roads started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.