अखेर ‘त्या’ शेतकर्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 22, 2014 00:16 IST2014-05-22T00:08:47+5:302014-05-22T00:16:43+5:30
जालना : तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी प्रभाकर नारायण तेलगड (६५) यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपल्या शेतात विषारी द्रव्य सेवन केले.

अखेर ‘त्या’ शेतकर्याचा मृत्यू
जालना : तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी प्रभाकर नारायण तेलगड (६५) यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपल्या शेतात विषारी द्रव्य सेवन केले. उपचारादरम्यान त्यांचा तिसर्या दिवशी २१ मे रोजी पहाटे २.३० वाजता निधन झाले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तेलगड यांनी १९ मे रोजी दुपारी विषारी द्रव्य सेवन केले. त्यामुळे त्यांना जालना येथील खाजगी दवाखान्यात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने डॉ. ऋषिकेश दीक्षित यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा परिवार आहे. दोन्ही हंगामातून काही उत्पन्न निघाले नाही. (प्रतिनिधी)