अखेर ‘ते’दारुचे दुकान बंद

By Admin | Updated: April 1, 2015 01:00 IST2015-04-01T00:48:39+5:302015-04-01T01:00:31+5:30

लातूर : उदगीर येथील विविध सामाजिक संघटनांनी साखळी उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा काढून देशी दारुचे दुकान बंद करावेत, अशी मागणी वेळोवेळी केली होती़

After all, the shop was closed | अखेर ‘ते’दारुचे दुकान बंद

अखेर ‘ते’दारुचे दुकान बंद


लातूर : उदगीर येथील विविध सामाजिक संघटनांनी साखळी उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा काढून देशी दारुचे दुकान बंद करावेत, अशी मागणी वेळोवेळी केली होती़ याबाबतचा अहवाल प्राप्त होताच हे दारुचे दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ३१ मार्च रोजी दिले आहेत़
आनंद झांबरे व भागिदारांच्या नावे मंजूर असलेले देशी दारुचे दुकान उदगीर येथे शिवाजी चौकात सत्यनारायण बिरादार यांच्या जागेमध्ये स्थलांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली होती़ परंतु ते दुकान तेथे सुरु केल्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला़ याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी पोले यांनी मंगळवारी सदरील आदेश पारित केले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: After all, the shop was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.