...अखेर दरवाजे बसविण्यास सुरूवात

By Admin | Updated: October 12, 2016 23:47 IST2016-10-12T23:36:47+5:302016-10-12T23:47:45+5:30

केदारखेडा/भोकरदन : येथील कोल्हापुरी बंधाऱ्यास गेट बसविण्यास बुधवारी सुरूवात झाली

After all, the door was finally opened | ...अखेर दरवाजे बसविण्यास सुरूवात

...अखेर दरवाजे बसविण्यास सुरूवात

केदारखेडा/भोकरदन : येथील कोल्हापुरी बंधाऱ्यास गेट बसविण्यास बुधवारी सुरूवात झाली. हा बंधारा गेल्या अनेक दिवसांपासून गेटच्या प्रतीक्षेत होता. गेट बसविल्याने पाणी वाहून जाण्याचे थांबणार आहे.
बंधाऱ्यावर गेट नसल्याने पाण्याचा अपव्यय होत होता. लोकमतने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभागाने काम सरू केले आहे.
याविषयी लोकमतनेही फोटोसह सविस्तर वृत प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची लघ ुजलसंधारण विभागाने दखल घेऊन गेट बसविण्यास सुरु वात केली आहे.या संबधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुध्दा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. बंधाऱ्यावर तात्काळ गेट टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गेट टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी लघुजलसंधारणचे शाखा अभिंयता आर.के.जाधव, सहाय्यक अंबादास सहाने, कृष्णा ठोंबरे, मधुकरराव तांबडे, पंडीत जाधव, पप्पू ठोंबरे, के. बी. जाधव, काकासाहेब जाधव, संचित जाधव, कडुबा जाधव, सदाशिव जुंबड, विनायक सावंत आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. एकूणच हे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे पूजन शनिवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक मान्यावरांची उपस्थिती राहाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: After all, the door was finally opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.