अखेर अभियांत्रिकीला कॅरिआॅन बहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:17 IST2017-08-13T00:17:17+5:302017-08-13T00:17:17+5:30

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केली.

 After all, the carrier is restored to the engineering | अखेर अभियांत्रिकीला कॅरिआॅन बहाल

अखेर अभियांत्रिकीला कॅरिआॅन बहाल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी लोणेरे येथील ‘बाटू’ विद्यापीठाची संलग्नता स्वीकारली आहे. यामुळे प्रथम वर्षाच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्यासाठी एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने तीन दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेत एक दिवसात निर्णय घेण्याची मागणी केली होती. यानंतर शनिवारी कुलगुरूंनी उपोषणकर्त्यांची भेट घेत कॅरिआॅन देण्याची घोषणा केली. यानंतर रिपब्लिक स्टुडंटस् फेडरेशनने जल्लोष केला, तर विद्यापीठाने २०१२ साली कायमस्वरूपी बंद केलेले कॅरिआॅन पुन्हा एकदा लागू केल्यामुळे ही गुणवत्तेशीच तडजोड असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रात उमटली.

Web Title:  After all, the carrier is restored to the engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.