अखेर कृषी कार्यालयाचे शासकीय जागेत स्थलांतर
By Admin | Updated: September 5, 2014 00:54 IST2014-09-05T00:29:48+5:302014-09-05T00:54:02+5:30
प्रकाश मिरगे , जाफराबाद अनेक वर्षांपासून भाडेत्वावर घेतलेल्या खाजगी इमारतीत असलेल्या कृषी कार्यालयाचे अखेर शासकीय जागेवर स्थलांतर करण्यात आले.

अखेर कृषी कार्यालयाचे शासकीय जागेत स्थलांतर
प्रकाश मिरगे , जाफराबाद
अनेक वर्षांपासून भाडेत्वावर घेतलेल्या खाजगी इमारतीत असलेल्या कृषी कार्यालयाचे अखेर शासकीय जागेवर स्थलांतर करण्यात आले. किरायाच्या इमारतीत शासकीय कार्यालय असल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेवून जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत ३ सप्टेंबर पासून हे कृषी कार्यालय स्थलांतरित झाले आहे.
तहसील कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्याने या कार्यालयाची जूनी इमारत रिकामी होती. त्या जागेत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी कार्यालयाचे स्थलांतर करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. ती पूर्ण झाली आहे. यामुळे हे कार्यालय शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही सोयीचे झाले आहे. जाफराबाद मंडळ कार्यालय देखील याच ठिकाणी आहे. कृषी कार्यालयाच्या स्थलांतरामुळे कृषी विभागाचे खाजगी इमारतीचे सुमारे २ लाखांचे भाडे वाचणार आहे.
दरम्यान, अद्यापही पोस्ट आॅफिस, सहाय्यक दुय्यम निबंधक या सारखी कार्यालये खाजगी जागेतच आहे. त्यांचेही याचप्रमाणे सोयीच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जाफराबादेत काही महत्वाची कार्यालय खाजगी इमारतीत अडगळीला आहेत. पैकी कृषी कार्यालयाचे स्थलांतर झाले. अद्यापही पोस्ट आॅफिस, सहाय्यक दुय्यम निबंधक या सारखे कार्यालये खाजगी जागेतच आहे. त्यांचेही याच पद्धतीने सोयीच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.