अपघातानंतर माजी सरपंचास बेदम मारहाण
By Admin | Updated: September 26, 2016 00:15 IST2016-09-25T23:41:46+5:302016-09-26T00:15:55+5:30
कडा: आष्टी तालुक्यातील धामणगाव रस्त्यावर शनिवारी कार व दुचाकी अपघातानंतर घाटापिंप्रीचे माजी सरपंच अशोक महादू घुमरे यांना मारहाण झाली. याप्रकरणी त्यांनी आष्टी ठाण्यात फिर्याद दिली.

अपघातानंतर माजी सरपंचास बेदम मारहाण
कडा: आष्टी तालुक्यातील धामणगाव रस्त्यावर शनिवारी कार व दुचाकी अपघातानंतर घाटापिंप्रीचे माजी सरपंच अशोक महादू घुमरे यांना मारहाण झाली. याप्रकरणी त्यांनी आष्टी ठाण्यात फिर्याद दिली.
शनिवारी दुपारी पाऊणेदोन वाजता माजी सरपंच घुमरे हे कार क्र. (एमएच ०९-बीएम-५६८१) वरुन कड्याहून घाटापिंप्रीकडे जात होते. त्यांच्या कारवर अचानक समोरुन येणारी दुचाकी आदळली. अपघातानंतर शाम भोजने, बाळू पवळ (दोघे रा. कडा) यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांनी घुमरे यांना गजाने मारहाण केली. झटापटीत त्यांच्या खिशातील दहा हजार रुपयेही लांबविले. शिवाय कारचेही नुकसान केले. घुमरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद असून तपास पोहेकॉ लगड करत आहेत. (वार्ताहर)