शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

Video: समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकेनंतर आता तर गोळीबार; पहा नेमकं काय घडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:05 IST

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला होता. त्यानंतर आता गोळीबाराची घटना पुढे आली आहे.

औरंगाबाद:समृद्धी महामार्गावर रोज अपघाताच्या घटना पुढे येत असताना आता सावंगी जवळील बोगद्याजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.  

महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून समृद्धी महामार्गाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र, यावरील प्रवासापेक्षा इतर घटनांमुळेच महामार्ग चर्चेत येत आहे. कधी बैलगाड्या महामार्गावर धावत आहे, तर कुठे हरण पळत आहे. शिवाय महामार्ग सुरु झाल्यापासून यावर रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. आता तर महामार्गावर एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तरुण उभा असलेल्या ठिकाणी पाठीमागे एक बोगदा दिसतोय. यावरून हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचा अंदाज आहे. हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. जीपसमोर उभा राहून तो हवेत गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे. 

महार्गावर बैलगाडी, रोज अपघात आता गोळीबारसमृद्धी महामार्गावर चालणाऱ्या बैल गाड्यांच्या ताफ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्गावर दोन हरण, साप, माकडे जात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

'समृद्धी'वर आणखी एक अपघातसमृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला ज्यात एका कारने समोरील दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच बुलढाण्यातील ही दुसरी घटना घडलीये.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCrime Newsगुन्हेगारी