८ वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभे
By Admin | Updated: June 30, 2016 01:23 IST2016-06-30T00:55:10+5:302016-06-30T01:23:01+5:30
औरंगाबाद : व्यवसायाने स्वत: डॉक्टर. वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत सर्व काही ठीक होते; परंतु त्यानंतर अचानक शरीरात मोठ्या प्रमाणात स्नायू दुर्बलता जाणवू लागली

८ वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभे
औरंगाबाद : व्यवसायाने स्वत: डॉक्टर. वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत सर्व काही ठीक होते; परंतु त्यानंतर अचानक शरीरात मोठ्या प्रमाणात स्नायू दुर्बलता जाणवू लागली. एक दोन पावले टाकणेही कठीण झाले. इतरांच्या मदतीशिवाय उभे राहणेही शक्य होत नव्हते; परंतु सेरिब्रल अटक्सिया या विकारावर यशस्वी उपचारानंतर तब्बल आठ वर्षांनंतर कोणाच्या मदतीशिवाय ते आज स्वत:च्या पायावर उभे राहू शकत आहेत.
या आजारावर मात करणाऱ्याचे नाव आहे डॉ. भानुदास सावळे. २००५ नंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात स्नायू दुर्बलता विकाराची लक्षणे समोर आली. बोलताना अडचण येऊ लागली. २ ते ३ वर्षे जनरल सर्जनकडे दाखविण्यात आले. सेरिब्रल अटक्सिया हा विकार असल्याचे निदान झाले. या विकारात स्नायूंच्या हालचालींवर परिणाम होतो. यामध्ये पाठीचा कणा दुखतो आणि मेंदूस जोडणाऱ्या पेशींना अडथळा निर्माण होतो. मदतीशिवाय डॉ. सावळे यांना चालणे शक्य होत नव्हते. आठ महिन्यांपूर्वी त्यांच्यावर मुंबई येथील न्यूरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्टेम सेल थेरपी’ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून दररोज आवश्यक ते व्यायाम करून घेण्यात आले. आज ते कोणाच्याही मदतीशिवाय उभे राहू शकत आहेत. बोलताना अडखळणेही कमी झाले आहे.