१४ वर्षानंतर नाट्यगृहाची पूर्णत्वाकडे वाटचाल...

By Admin | Updated: December 22, 2014 00:59 IST2014-12-22T00:46:43+5:302014-12-22T00:59:15+5:30

उस्मानाबाद : शहरात उभारण्यात आलिशान नाट्यगृहाच्या कामाचा ‘वनवास’ १४ वर्षानंतर संपताना दिसत नाही़ सन २००९-१० ला सुरू झालेले हे काम ‘साऊंडसिस्टीम’पर्यंत येवून ठेपले आहे़

After 14 years, theater is moving towards completeness ... | १४ वर्षानंतर नाट्यगृहाची पूर्णत्वाकडे वाटचाल...

१४ वर्षानंतर नाट्यगृहाची पूर्णत्वाकडे वाटचाल...


उस्मानाबाद : शहरात उभारण्यात आलिशान नाट्यगृहाच्या कामाचा ‘वनवास’ १४ वर्षानंतर संपताना दिसत नाही़ सन २००९-१० ला सुरू झालेले हे काम ‘साऊंडसिस्टीम’पर्यंत येवून ठेपले आहे़ आतील स्टेज, खुर्च्यां, इमारतीच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून, ९० लाखाच्या ‘साऊंडसिस्टीम’ कामाला नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे़ या कामानंतर एक महिन्याच्या कालावधीत उस्मानाबादकरांसाठी नाट्यगृह खुले होणार आहे़
उस्मानाबाद नगर पालिकेने कार्यालयानजीकच टोलेजंग नाट्यगृह उभारणीचे काम सन २००९-१० मध्ये सुरू केले होते़ नाट्यगृह बांधकामासाठी जवळपास ३ कोटी ५४ लाख, आतील स्टेजसह इतर कामासाठी जवळपास १ कोटी रूपये, खुर्च्यांसाठी जवळपास ३० लाख रूपये, अंतीम टप्प्यात असलेल्या साऊंड सिस्टीम, कुलींग, सीसीटीव्ही कॅमेरे आदीसाठी जवळपास ९० लाख असा जवळपास सहा कोटी रूपयांचा खर्च या नाट्यगृहाच्या उभारणीवर आला आहे़ उस्मानाबाद शहराच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या वैैभवात भर घालणाऱ्या या नाट्यगृहाचे गत काही वर्षापूर्वी प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत रंगारंग उद्घाटन सोहळा घेण्यात आला होता़ त्यानंतर लवकरच जिल्ह्यातील कालाकारांचे हक्काचे व्यासपीठ खुले होईल, ही आशा होती़ मात्र, तांत्रिक व इतर अडचणींमुळे या नाट्यगृहाचे काम रखडले होते़ सद्यस्थितीत आतील स्टेज, खुर्च्या बसविण्यासह इतर कामे पूर्ण झालेली आहेत़ साऊंड सिस्टीमच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी पालिकेच्या जीबीमध्ये विषय ठेवण्यात आला होता़ मात्र, ती सर्वसाधारण सभा रद्द झाली आहे़ सभा रद्द झाल्यामुळे कामाची मंजुरीही रखडली असून, त्यामुळे कामही रेंगाळले आहेत़ जिल्ह्यातील महाविद्यालयीन कलाकारांसह इतर नाट्यमंडळातील कलाकारांनी आपल्या कलाकसरीतून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे़ त्यांना मिळणारे हक्काचे व्यासपीठ व नाट्यगृहाच्या उभारणीनंतर इथे होणारे मोठ-मोठे कार्यक्रम यातून शहरातील कलाप्रेमींना एक वेगळाच आनंद देवून जाणारे आहेत़ त्यामुळे या नाट्यगृहाचे काम नव्या वर्षात तरी पूर्ण करून कलाकारांच्या, कलाप्रेमींच्या अपेक्षा पूर्णत्वास न्याव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)४
नाट्यगृहाच्या उभारणीचा खर्च पाहता त्याची देखभाल दुरूस्तीसह इतर बाबींवर येणारा खर्च पालिकेच्या बजेटमध्ये बसणारा दिसत नाही़ नाट्यगृह चालविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ पालिकेकडे नाही़ त्यामुळे हे नाट्यगृह पूर्णत्वास आल्यानंतर खाजगी तत्त्वावर देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़४
नाट्यगृहातील इतर कामे झालेली आहेत़ साऊंड सिस्टीम आणि कुलींगचे काम राहिले आहे़ या कामाच्या मंजुरीसाठी नगर पालिकेच्या जीबीमध्ये विषय ठेवण्यात आला आहे़ पालिकेच्या जीबीमध्ये विषयास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने एका महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़

Web Title: After 14 years, theater is moving towards completeness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.