परळीत १३ अर्ज बाद
By Admin | Updated: March 31, 2015 00:39 IST2015-03-30T23:53:54+5:302015-03-31T00:39:31+5:30
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकपदांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत असून, सोमवारी छानणी प्रक्रिया पार पडली. १३ उमेदवारी अर्ज बाद झाले.

परळीत १३ अर्ज बाद
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकपदांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत असून, सोमवारी छानणी प्रक्रिया पार पडली. १३ उमेदवारी अर्ज बाद झाले.
२१ जागांसाठी १२१ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. छानणी दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. भाजपकडून आ. आर.टी. देशमुख, फुलचंद कराड, नामदेवराव आघाव उपस्थित होते. शिवाय पालकमंत्री पंकजा मुंडे या देखील शहरात तळ ठोकून होत्या. १३ अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले होते. पैकी ते सर्व अवैध ठरले तर ९६ अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, छानणी दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी तहसील कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मंगळवारी नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्या येणार आहे.
१५ दिवसांची मुदत
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत मिळणार आहे. १ ते १५ एप्रिल दरम्यान अर्ज मागे घेता येतील. (वार्ताहर)