शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 11:41 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली.

औरंगाबाद : जालना-जळगाव या १७४ कि.मी. नव्या रेल्वे मार्गाच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी (फायनल लोकेशन सर्व्हे) फेब्रुवारीत निधी मंजूर झाला. त्यानंतर सर्वेक्षणाला गती देण्यात आली. या मार्गाचे सर्वेक्षण भौतिकदृष्ट्या सुरू आहे. त्याबरोबरच आता १४ मे पासून हवाई सर्वेक्षणही केले जात आहे. विमानाद्वारे आगामी ४ दिवसांत हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा ‘फायनल लोकेशन सर्वे’ ८ फेब्रुवारी रोजी मंजूर केला गेला होता. या सर्वेक्षणाचे काम भौतिकदृष्ट्या (फिजिकली ) सुरूच आहे. त्याचबरोबर हवाई सर्वेक्षणासाठी अकोला येथे विमान दाखल झाले आहे. या विमानाद्वारे रडारचा (लिडार) वापर करून हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे. १४ ते १७ मे या ४ दिवसांत हे सर्वेक्षण होणार आहे. हे विमान एका दिवसाला ५० कि. मी. सर्वेक्षण करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेक्षणाला गती मिळेल, असे या ट्वीटमध्ये रावसाहेब दानवे यांनी नमूद केले आहे. सर्वेक्षणासाठी त्यांनी ४.५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.

असा जाणार मार्गअंतिम भूखंड सर्वेक्षण झाल्यानंतर मार्गाचा प्रस्ताव हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. जालना- जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा हा मार्ग जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

असा होणार फायदाया रेल्वे मार्गाचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वे गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून होणार आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटनस्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाrailwayरेल्वेJalgaonजळगाव