वकिलावर पुष्पनगरीत चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST2021-07-31T04:04:06+5:302021-07-31T04:04:06+5:30

रमेश नाथाराम घोडके पाटील (रा. शक्तीनगर, तुकनगिरी मठ, ह.मु. तापडिया प्राइड, महानुभाव आश्रमाजवळ), असे जखमी वकिलाचे नाव असून, भरत ...

Advocate stabbed in Pushpanagar | वकिलावर पुष्पनगरीत चाकूहल्ला

वकिलावर पुष्पनगरीत चाकूहल्ला

रमेश नाथाराम घोडके पाटील (रा. शक्तीनगर, तुकनगिरी मठ, ह.मु. तापडिया प्राइड, महानुभाव आश्रमाजवळ), असे जखमी वकिलाचे नाव असून, भरत ऊर्फ बिट्टू गिरीशगिरी मेहता (रा. श्रीकृष्णनगर), असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. रमेश घोडके हे २९ जुलै रोजी तुकनगिरी मठ येथे जगदीश मेहता यांच्या घरी पुष्पनगरी येथे गेले होते. तेथे वंदना मेहता, अपूर्वा मेहता, जगदीश मेहता हे सर्व हजर होते. आरोपी भरतदेखील तेथे आला. त्याला रंगनाथ पाटील व त्यांच्या पत्नीशी रोडवर माती टाकण्याच्या कारणावरून वाद का घातला, हे विचारले. त्याचा राग आल्याने भरतने ॲड. रमेश घोडके यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला चढविला. घोडके यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यात घोडके यांच्या उजव्या हातावर जखम झाली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारी म्हटले आहे. अधिक तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत.

Web Title: Advocate stabbed in Pushpanagar