भटक्या कुत्र्यांसाठी आता दत्तक योजना
By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:45+5:302020-12-05T04:07:45+5:30
दि. ३० नोव्हेंबर रोजी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कुत्र्यांची दोन पिल्ले दत्तक ...

भटक्या कुत्र्यांसाठी आता दत्तक योजना
दि. ३० नोव्हेंबर रोजी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कुत्र्यांची दोन पिल्ले दत्तक घेऊन या अभिनव योजनेचा आरंभ केला. शहरातील बेवारस कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवाय अन्न न मिळाल्याने अनेक कुत्र्यांची उपासमारही होत आहे. हे सगळे थांबविण्यासाठी आणि भारतीय जातीच्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी दत्तक योजनेच्या माध्यमातून त्यांना आसरा देणे गरजेचे आहे.
चौकट :
खरेदी करू नका, दत्तक घ्या
औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनतर्फे कुत्रे दत्तक देण्याचे काम २ वर्षांपासून सुरू असून, आता औरंगाबाद महापालिकाही या उपक्रमाशी जोडली गेली आहे. महागडे विदेशी कुत्रे खरेदी करण्यापेक्षा भारतीय जातीच्या बेघर कुत्र्यांना निवारा देणे कधीही श्रेयस्कर. विदेशी कुत्रे सांभाळणे महागडे जाते. तुलनेने भारतीय कुत्रे वाढविणे अगदीच सोपे आहे. दत्तक देण्यात येणाऱ्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण मोफत करून दिले जाते. कुत्रे घरी येताच मुलेही कुत्र्यांसोबत रमतात आणि नकळतच गॅझेट्सपासून दूर राहतात, असा अनुभवही अनेकांनी घेतला आहे.
- बेरील सॅंचिस
चौकट :
आस्तिककुमार यांचे आवाहन
मोकाट कुत्र्यांचा त्रास काही भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यातूनच कुत्रे चावून जखमी झाल्याच्या घटनाही पुढे येतात. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, म्हणून आज पुढाकार घ्या आणि स्वदेशी जातीच्या कुत्र्यांना दत्तक घ्या. यामुळे भटक्या आणि बेवारस कुत्र्यांना एक हक्काचे घर आणि तुमचे प्रेम मिळेल, असे आवाहन आस्तिककुमार पांडे यांनी औरंगाबादकरांना केले आहे.
फोटो ओळ :
कुत्रे दत्तक घेताना मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे.