१६ विद्यार्थ्यांना घेतले शिक्षणासाठी दत्तक

By Admin | Updated: September 3, 2014 01:10 IST2014-09-03T01:00:59+5:302014-09-03T01:10:48+5:30

सितम सोनवणे , लातूर येथील अमर गणेश मंडळाने प्रतीवर्षाप्रमाणे हनुमान चौकातील कामदार रोडवर श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील

Adoption of 16 students took education | १६ विद्यार्थ्यांना घेतले शिक्षणासाठी दत्तक

१६ विद्यार्थ्यांना घेतले शिक्षणासाठी दत्तक


सितम सोनवणे , लातूर
येथील अमर गणेश मंडळाने प्रतीवर्षाप्रमाणे हनुमान चौकातील कामदार रोडवर श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील मुले शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा उपक्रम मंडळाचा आहे़ मंडळाने यावर्षी तब्बल १६ मुले दत्तक घेतली आहेत़ त्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मंडळाच्या माध्यमातून होणार आहे़
अमर गणेश मंडळाची स्थापना १९७५ साली करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यात नावाजलेल्या अमर गणेश मंडळाच्या सक्रियतेसाठी संस्थापक मंडळातील सदस्यांची तिसरी पिढी समोर आली आहे़ या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात़ यात प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येते़ अशा प्रकारे जेष्ठांना दृष्टी देण्याचा एक चांगला उपक्रम अमर गणेश मंडळाने साध्य केला आहे़ विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत पहिली ते दहावी पर्यंतची इंग्रजी, सेमीइंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते़ ज्यांची आर्थिक परिस्थीती नाजूक असते अशा घटकातील शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी दत्तक म्हणून घेतले जाते़ मागच्या वर्षी १४ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला होता़ तर यावर्षी १६ विद्यार्थ्यांना या दत्तक योजनेचा लाभ मिळणार आहे़ या योजनेमुळे प्राथमिक शिक्षणातला मोठा अडथळा दुर करुन विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे़ या अग्रहाखातर मंडळाच्या वतीने वर्षभराचे शालेय साहित्य, शालेय फीस, गणवेश, वह्या, पुस्तके आदी साहित्यासह सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मंडळ पेलते़ यामुळे या मंडळाची दत्तक योजना ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरत आहे़

Web Title: Adoption of 16 students took education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.