पॉलिटेक्निक प्रवेशासाठी एआरसी सेंटरवर अॅडमिशन कीट
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T00:55:53+5:302014-06-28T01:20:18+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांमधील मान्यताप्राप्त ७४ इन्स्टिट्यूटमधील तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपासून
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी एआरसी सेंटरवर अॅडमिशन कीट
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांमधील मान्यताप्राप्त ७४ इन्स्टिट्यूटमधील तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्याअंतर्गत शहरातील १२ अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) अॅडमिशन कीट विक्रीला प्रारंभ झाला.
मराठवाड्यात १० शासकीय आणि ६४ खाजगी शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आहेत. या संस्थांमध्ये तीन वर्षे कालावधीचे पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. या संस्थांमध्ये २६ हजार ९४६ विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत २७ जून ते ६ जुलै या कालावधीत अॅडमिशन कीटची विक्री करण्यात येत आहे. आज शहरातील १२ एआरसी सेंटरवर अॅडमिशन कीट खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही गर्दी केली होती.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये कीटची किंमत आहे. या कीटसाठी आॅनलाईन मराठवाड्यातील एकूण विविध अॅप्लिकेशन रिसिप्ट (एआरसी) सेंटरवर अॅडमिशन कीट खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती. अॅडमिशन कीटसोबत विद्यार्थ्यांना एक युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आला आहे. त्याआधारे विद्यार्थ्यांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागेल.
त्यानंतर ७ जुलै रोजी तात्पुरती मेरिट यादी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. ८ आणि १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अॅडमिशन फॉर्ममधील त्रुटी दुरुस्त करता येतील. त्यानंतर १२ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. त्याआधारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांत १४ ते १७ जुलैदरम्यान पसंती फॉर्मनुसार महाविद्यालयांची नावे देण्यात येतील. त्या महाविद्यालयात १९ जुलैपर्यंत त्यांना रिपोर्टिंग करणे अनिवार्य
असेल.
त्यानंतर दुसरी आणि तिसरी प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. शेवटची प्रवेश फेरी ही कौन्सिलिंग पद्धतीची असून, ती आॅगस्टमध्ये राबविण्यात येणार आहे.
७४ संस्थांमध्ये
२६ हजार ९४६ जागा
मराठवाड्यात तंत्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम शिकविणाऱ्या १० शासकीय आणि ६४ खाजगी शिक्षण संस्थांचे पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आहेत. या संस्थांमध्ये २६ हजार ९४६ विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो. जास्तीत जास्त जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी संस्था प्रयत्नशील आहेत.