कौतुकास्पद ! कोरोना योद्ध्यांच्या मनोबल वाढीसाठी डॉक्टरचे पीपीई कीटमध्ये नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 07:15 PM2020-07-22T19:15:17+5:302020-07-22T19:48:47+5:30

हा व्हिडीओ सकारात्मक नजरेतून पाहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Admirable ! Doctor's dance in PPE kit to boost the morale of Corona Warriors | कौतुकास्पद ! कोरोना योद्ध्यांच्या मनोबल वाढीसाठी डॉक्टरचे पीपीई कीटमध्ये नृत्य

कौतुकास्पद ! कोरोना योद्ध्यांच्या मनोबल वाढीसाठी डॉक्टरचे पीपीई कीटमध्ये नृत्य

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर गेली काही महिने आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर उपचार करीत आहेत. रुग्णालयात काम करताना डॉक्टरांवरही प्रचंड मानसिक ताण आहे. अशातच शहरातील एका डॉक्टरने पीपीई कीट घालून एका गाण्यावर नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केला आहे. 

डॉ. पराग अंभोरे असे या डॉक्टरांचे नाव आहे. पीईएस महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ते कार्यरत आहेत. प्रचंड उकाडा होणार्‍या, परंतु तितक्याच सुंदर दिसणार्‍या आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पीपीई किटच्या पोशाखामध्ये डॉक्टरांना काम करावे लागत आहे. या पोशाखात सतत रुग्णसेवा देणे अवघड आहे. परंतु त्याची पर्वा न करता प्रत्येक डॉक्टर २४ तास रुग्णसेवा देत आहे.

कौतुकास्पद ! सहकाऱ्यांचे मनोबल वाढीसाठी पीपीई कीटमध्ये कोरोना योद्धा डॉक्टरचे नृत्य

Posted by Lokmat Aurangabad on Wednesday, 22 July 2020

सर्व डॉक्टरांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न पीपीई कीट घालून नृत्य करण्यामागे असल्याचे डॉ. अंभोरे यांनी सांगितले. हा व्हिडीओ सकारात्मक नजरेतून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Admirable ! Doctor's dance in PPE kit to boost the morale of Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.