शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2023 16:29 IST

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते.

छत्रपती संभाजीनगर: अभिनेना आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेने राज्यात घेतलल्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावच्या (ता.खुलताबाद) चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या गटाने  नुसता सहभागच नाही नोंदविला तर दहा महिने अथक परिश्रम करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावत १५ लाखांचे बक्षीस मिळविले. 

चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाच्या सुनीता आढाव आणि सुवर्णा जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गोळेेगावकरांनी २०१७ ते २०२० या कालावधीत माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाने केली. यामुळे गावाची भूजलपातळी वाढली. मात्र या स्पर्धेत गोळेगावकरांना बक्षीस मिळाले नव्हते. गतवर्षी २०२२ साली पाणी फाऊंडेशनने शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. 

या स्पर्धेत गावातील २६ महिलांनी एकत्र येऊन चित्रा नक्षत्र महिला शेतकरी बचत गटाची नोंदणी ३१ मे २०२२ रोजी सहभाग नोंदविला. राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. गावाचे उपसरपंच संतोष जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेचे समन्वयकांशी चर्चा करून महिलांना प्रशिक्षण दिले. महिलांनी ही स्पर्धा समजून घेतली. यानंतर २६ महिलांनी एकजुटीने कापूस शेती केली. कृषीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीला आवश्यक तेवढ्याच खतांची मात्र पिकांना दिली. 

जैविक किटकनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च एकरी केवळ १० हजारपर्यंत कमी झाला. एवढेच नव्हे तर उत्पादनातही दुप्पट वाढ झाली.गोळेगावच्या चित्रा नक्षत्र महिला गटाने सहा महिन्यात कमी खर्चात कापसाचे दुप्पट उत्पादन घेऊन दाखविल्याने या गटाला फार्मर कप स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे रोख १५ लाख आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळवले. १२ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या एका समारंभात अमीर खान आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार या शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपसरपंच संतोष जोशी, प्रल्हाद अरसूळ यांच्यासह शेतकरी गटातील महिलांची उपस्थिती होती.

आवड सवड योजना राबविलीशेतकरी गटातील पाच पाच महिलांचा एक गट तयार केला. यानंतर आवड-सवड करीत परस्परांच्या शेतात जाऊन शेतीची कामे पूर्ण केल्याने मजूरांवरील खर्च वाचल्याचे आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAamir Khanआमिर खानWaterपाणी