३१ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी
By Admin | Updated: March 23, 2016 00:28 IST2016-03-23T00:26:19+5:302016-03-23T00:28:52+5:30
हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

३१ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी
हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत जि. प. कडून आलेल्या ३१ गावांतील ३२ नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मार्च रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
यामध्ये औंढा तालुक्यातील निशाणा, तळणी (वाळकी), राजापूर, जांब राजा, आसोंदा, गोळेगाव, अनखळीवाडी, येळी, टाकळगव्हाण, तपोवन, सावळी तांडा, सावळी खुर्द, सुकापूर, वसमत तालुक्यातील हट्टा येथे २, परजणा, बोरी सावंत, मुळी, मुरुंबा, सारोळा, इंचा, इसापूर, अंभेरी, भटसावंगी वाडी, तिखाडी, पातोंडा, दुर्गसावंगी, बासंबा, बोंडाळा, समगा, कडती या गावांत टंचाईअंतर्गत विंधन विहिरीस मंजुरी दिली आहे.
यामध्ये प्रतीविहिरीस ४५ हजार ८११ रुपयांप्रमाणे १४.६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यात दुसऱ्या योजनेतून काम होत नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यात विहीर-बोअर अधिग्रहणाची संख्या २0३ वर पोहोचली आहे. यात टँकरसाठी १७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. तर त्याव्यतिरिक्त १८६ अधिग्रहणे आहेत. यामध्ये हिंगोली-१५, कळमनुरी-४0, सेनगाव-५0, वसमत-५६ तर औंढा नागनाथ तालुक्यातील २५ अधिग्रहणांचा समावेश आहे. . (प्रतिनिधी)